Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे
मुंबईसह महानगर परिसरात एमएमआरडीएमार्फत विकास कामे सुरू आहेत अशा बांधकाम ठिकाणांवर धूळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाणे धुळमुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुंबई : संदिप शिंदे.
महाराष्ट्र राज्यातील वाढत्या प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहिम स्वरुपात काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरीता 1000 टॅंकर्स लावावेत त्यासाठी विशेथ पथक नियुक्त करावे. एमएमआरडीची बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. ॲण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा, असे मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले.
राज्यातील वायू प्रदूषणाचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आढावा घेतला. "वर्षा" निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
मुंबईत विविध ठिकाणे सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत त्याचबरोबर साचलेली धुळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईसह महानगर परिसरात एमएमआरडीएमार्फत विकास कामे सुरू आहेत अशा बांधकाम ठिकाणांवर धूळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाणे धुळमुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्यांवरून जाताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्या असे मुख्यमंत्र्यांनी महानगर आयुक्तांना सांगितले.
रिपोर्टर