Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
ग्लेन मॅक्सवेल नामक वादळात अफगाण गोलंदाजांची शरणागती.
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 39 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला.
ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय
मुंबई : गुरुदत्त वाकदेकर
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 39 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 50 षटकांत 5 गडी गमावून 291 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 46.5 षटकांत सात विकेट गमावत 293 धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह कांगारू संघाने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला आहे. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 291 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात 293 धावा केल्या आणि सामना जिंकला.
अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने सर्वाधिक नाबाद 129 धावा केल्या. राशिद खानने 35 धावांची नाबाद खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने दोन बळी घेतले. मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी नाबाद 201 धावा केल्या. मिचेल मार्शने 24 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक, अजमतुल्ला उमरझाई आणि रशीद खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाने 91 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. यानंतर मॅक्सवेलने पॅट कमिन्ससोबत 202 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. या विश्वचषकातील हे पहिलेच द्विशतक होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू ठरला.
अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला 292 धावांचे लक्ष्य दिले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानने 50 षटकांत 5 गडी गमावून 291 धावा केल्या. विश्वचषकाच्या इतिहासातील ही अफगाणिस्तानची सर्वोच्च धावसंख्या आहे. इब्राहिम झद्रानने 143 चेंडूत 129 धावा केल्या, तर राशिद खानने 18 चेंडूत 35 धावांची नाबाद खेळी केली. अखेरीस इब्राहिम आणि रशीद यांच्यात सहाव्या विकेटसाठी 28 चेंडूत 58 धावांची नाबाद भागीदारी झाली. अफगाणिस्तानने शेवटच्या पाच षटकात 64 धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. रहमानउल्ला गुरबाज 25 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. यानंतर रहमत शाह आणि इब्राहिम झद्रान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. रहमत 30 धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर इब्राहिमने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. शाहिदी 26 धावा करून बाद झाला. अजमतुल्ला उमरझाईही 22 धावा करून तंबूमध्ये परतला. मोहम्मद नबी 12 धावा करू शकला. दरम्यान, इब्राहिमने एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. इब्राहिमने 143 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 129 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी राशिदने 18 चेंडूत 35 धावांच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने दोन बळी घेतले. तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. ट्रॅव्हिस हेड खाते न उघडताच बाद झाला. नवीन उल हकने त्याला यष्टिरक्षक इक्रम अलीखिलकरवी झेलबाद केले. आता वॉर्नर आणि मिचेल मार्शने झटपट धावा काढून ऑस्ट्रेलियाला दमदार पुनरागमन केले, पण मार्श 24 धावा करून नवीनचा दुसरा बळी ठरला. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 43 धावा होती. अजमतुल्ला उमरझाईने सलग दोन चेंडूंत विकेट घेत ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीत आणले. डेव्हिड वॉर्नरने 29 चेंडूत 18 धावा केल्या. यानंतर जोश इंग्लिसला इब्राहिम झद्रानने झेलबाद केले. मात्र, षटकातील तिसरा चेंडू मॅक्सवेलच्या बॅटच्या कडेला लागला आणि त्याची हॅटट्रिक हुकली. नऊ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 51/4 होती. रहमत शाहच्या अचूक थ्रोमुळे 14 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर लॅबुशेन धावबाद झाला. 73 धावांवर पाच गडी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ संघर्ष करत होता. स्टॉइनिसही सहा धावा करून बाहेर पडला. रशीद खानने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. स्टार्कही तीन धावा करून बाद झाला. रशीदच्या चेंडूवर यष्टीरक्षकाने झेल घेतला. चेंडू त्याच्या बॅटला लागला नसला तरी स्टार्कने रिव्ह्यू घेतला नाही. 20 षटकांत 98 धावांत सात गडी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित झाला होता. अशा परिस्थितीत ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी शानदार भागीदारी केली. मॅक्सवेलला अनेक जीवदान मिळाली. 33 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर मुजीबने अतिशय सोपा झेल सोडला. यानंतर या दोघांनी आठव्या विकेटसाठी 202 धावांची नाबाद भागीदारी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. 128 चेंडूत 20 धावा केल्यानंतर मॅक्सवेल नाबाद राहिला. त्याने चौकार आणि 10 षटकार मारले. त्याचवेळी कमिन्सने 68 चेंडूत नाबाद 12 धावा केल्या. त्याच्या खेळीत एका चौकाराचा समावेश होता. कमिन्सच्या संयमी खेळीचे कौतुक करावे तितके कमी आहे. मॅक्सवेलला आराम मिळावा म्हणून त्याने काही षटके एकट्यानेच निर्धाव खेळून काढली.
रिपोर्टर