Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
शिवसेना व्यापारी सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सोहळा अंधेरी पूर्व जनसंपर्क कार्यालयात उत्साहात पार पडला...
मुंबई : संदिप शां. शिंदे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामांच्या बळावर क्रित्येक कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी होत आहेत, मराठा आरक्षणावर शिंदे यांनी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून मराठा आरक्षण देणार यावर मराठा समाजाची युवापिढी एकनाथ शिंदे यांच्या सोबत उभे राहण्यास तयार झाली आहे. याचेच प्रमाण एकनाथ शिंदे संकल्पनेतून साकारलेल्या शिवसेना व्यापारी सेना मुंबईत कार्यरत आहे शिंदे यांच्या सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याच्या पद्धतीवर व्यापारी वर्ग शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहे.
शिवसेना व्यापारी सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सोहळा अंधेरी जनसंपर्क कार्यालयात पार पडला. शिवसेना व्यापारी सेनेच्या अंधेरी पूर्व जनसंपर्क कार्यालयात मुंबई विभागाच्या विभाग क्रमांक 14 तसेच मलबार हील विधान सभा आणि विलेपार्ले विधानसभा पदी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून "व्यापारी सेना मुंबई अध्यक्ष मा. श्री. हितेश अजानी" यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले. सदर कार्यक्रमात शिवसेना संघटक विभाग 14 चे श्री. विजय वाडकर, व्यापारी सेना सचिव श्री. राजेश झुनझुनवाला, श्री. संदिप शिंदे, समन्वक श्री. प्रेमसागर चौरसिया, अंधेरी विभाग अध्यक्ष श्री. रवींद्र सिंग ( विभाग क्रमांक 4), श्री. विनोद धोत्रे,(विभाग अध्यक्ष विभाग क्रमांक 5), श्री. राजेश गायकवाड ( विभाग अध्यक्ष विभाग क्रमांक 2),श्री. हर्षद सोमया ( विभाग अध्यक्ष विभाग क्रमांक 14), श्री. श्रीकांत गायकवाड (विभाग अध्यक्ष विभाग क्रमांक 3),वरिष्ठ सहकारी श्री. लक्ष्मण पवार, श्री. सचिन झोईल ( उपविभाग प्रमुख )व्यापारी सेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली श्री. हर्षद र. सोंमया : विभाग अध्यक्ष विभाग क्रमांक १४. श्री. सुनील भ. धुतिया : उपविभाग अध्यक्ष विभाग क्रमांक १४. श्री. लक्ष्मण शि. म्हस्के : उपविभाग अध्यक्ष मलबार हिल विधान सभा. श्री. सागर प्र. मालुसरे : सचिव मलबार हिल विधान सभा. श्री. हितेश गो. गुरव : सह सचिव मलबार हिल विधानसभा. श्री. समीर चं. जाईगडे : अध्यक्ष वार्ड क्रमांक : २१४. श्री. सौरभ अडणकट : अध्यक्ष विलेपार्ले विधानसभा. पदी नियुक्ती करण्यात आली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व चा विचार व धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन शिवसेना व्यापारी सेनेचा प्रचार आणि प्रसार करीत सर्व व्यापारी बांधव आणि इतर समाजा सोबत पक्ष वाढवण्यासाठी आणि पुढील सामाजिक, राजकीय वाटचाली करिता सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना शिवसेना व्यापारी सेना तर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या येत्या काही महिन्यात शिवसेना व्यापारी सेना मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षते खाली मुंबईभर व्यापारी वर्गाच्या आणि स्थानिक जनतेच्या हितासाठी कार्यक्रम राबवणार असल्याचे मुंबई अध्यक्ष श्री. हितेश अजानी यांनी सांगितले.
रिपोर्टर