Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त कविसंमेलन आणि राजमाता ई-बुक प्रकाशन सोहळा संपन्न..
मुंबई : गुरुदत्त वाकदेकर
रघुवीर क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव, मुंबई, राष्ट्रकुट युट्युब वाहिनी आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय नवरात्रौत्सव कविसंमेलन अभ्युदय नगर, काळाचौकी येथे संपन्न झाले. त्याप्रसंगी व्यासपीठावर रघुवीर क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे अध्यक्ष वैभव कांबळी, सचिव निशांत बर्वे, राष्ट्रकुट युट्यूब वाहिनीचे संपादक प्रकाश ओहळे, कविसंमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री सन्माननीय वैभवी विनीत गावडे तसेच मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक गुरूदत्त वाकदेकर उपस्थित होते. संमेलनाच्या सुरूवातीलाच सर्व मान्यवरांचा सन्मान शाल आणि शब्दगुच्छ अर्थात पुस्तक देऊन करण्यात आला.
शारदीय नवरात्रौत्सव कविसंमेलनाला रघुवीर क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे अध्यक्ष वैभव कांबळी आणि सचिव निशांत बर्वे यांनी खूप मनापासून शुभेच्छा दिल्या. तर समारोपप्रसंगी संमेलनाध्यक्ष मान्यवर ज्येष्ठ कवयित्री वैभवी गावडे यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले. कविसंमेलनाची सांगता त्याच्याच महालक्ष्मीवरच्या आरतीने झाली.
शारदीय नवरात्रौत्सव कविसंमेलनात मुंबई जिल्ह्यातील निमंत्रित मान्यवर कवी समीर बने, सनी ग. आडेकर, महेश अविनाश नाडकर्णी, सुचित्रा अशोक कुंचमवार, किशोरी शंकर पाटील, प्रकाश तुकाराम जाधव, विवेकानंद यशवंत मराठे, सुनिता पांडुरंग अनभुले, प्रदीप महादेव कासुर्डे, मोरेश्वर हुताश बागडे, संतोष धर्मराज मोहिते, सरोज सुरेश गाजरे, नंदा कोकाटे, देवदत्त रामचंद्र जोशी, शैलेश भागोजी निवाते, स्नेहा संजय फदाले, विक्रांत मारुती लाळे, सविता नारायण काळे, सीमा विश्वास यांच्या देवीवरच्या दमदार रचनांनी कविसंमेलन दिमाखात संपन्न झाले.
कविसंमेलनाचे सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक तसेच साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. त्यांनी सर्व कवींचा सुंदर असा परिचय करून दिल्याने कार्यक्रमात अधिक उत्साह जाणवला.
संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींच्या कवितांचा सुंदर असा "राजमाता ई-काव्यसंग्रह" मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित करण्यात आला. सर्व सारस्वतांचा सुंदर सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सादर झालेल्या सर्व कवींच्या कवितांचे एकत्रीकरण करून त्याचे प्रसारण "राष्ट्रकुट युट्युब" वाहिनीवरून प्रसारित करण्यात आले. त्यासाठी संपादक प्रकाश ओहळे आणि छायाचित्रणकार अनिल पानस्कर यांचे मोलाचे योगदान लाभले. कविसंमेलन यशस्वीपणे पार पडण्यासाठी रघुवीर क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांनी तसेच संजय कचरे-पाटील यांनी अविश्रांत मेहनत घेतली.
रिपोर्टर