Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
शारदीय नवरात्रोत्सवाची सातवी माळ असलेल्या शुभदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर मुंबईतील प्रसिद्ध दांडिया आयोजक मंडळांना भेटी देऊन अंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले आणि नागरिकांशी संवाद साधला.
मुंबई : प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवाची सातवी माळ असलेल्या शुभदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर मुंबईतील प्रसिद्ध दांडिया आयोजक मंडळांना भेटी देऊन अंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले आणि नागरिकांशी संवाद साधला.
यात बोरिवलीतील कोरा केंद्र मैदानात गणेश नायडू यांच्या नायडू क्लबने आयोजित केलेल्या दांडिया महोत्सवाला शिंदे यांनी भेट दिली.
यानंतर मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अशा खासदार गोपाळ शेट्टी यांनी आयोजित केलेल्या नवरात्री उत्सवाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. या दांडियाचे वैशिष्ट्य म्हणजे दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक या दांडियामध्ये गाणी सादर करतात. यानंतर आमदार प्रवीण दरेकर यांच्या रायगड प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रंग रास दांडिया महोत्सवाला भेट दिली. तसेच प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या रंगताबी गरबा महोत्सवाला आणि मागाठाणे येथील देवीचा पाडा येथे आयोजित केलेल्या दांडिया महोत्सवाला उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांनी गरबा प्रेमींशी सवांद साधला..
यासोबतच मीरा भाईंदर येथे आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्री महोत्सवाला उपस्थित राहून गरबा प्रेमींचा उत्साह वाढवला. तर ठाण्यात अशर फाउंडेशनच्या वतीने मॉडेला चेकनाका येथे आयोजित केलेला रास रंग महोत्सव, आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दांडिया महोत्सव तसेच किसन नगर मध्ये माजी नगरसेवक योगेश जानकर आणि श्रीनगर येथे परेश चाळके तसेच शशिकांत जाधव यांनी आयोजित केलेल्या गरबा महोत्सवाला शिंदे यांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
राज्य सरकारने सर्व सणांवरील निर्बंध दूर केले असून त्यामुळेच नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस उत्साहात दांडिया खेळता येणे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जींच्या नेतृत्वाखाली सर्व हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले राम मंदिर लवकरच साकारले जाणार असून त्यावेळी याच उत्साहात जल्लोष करायचा असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रताप सरनाईक, माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक, मा.आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका सौ.नम्रता फाटक, सौ.मीनल संख्ये, अशर फाउंडेशनचे अजय अशर, जीतूभाई मेहता, माजी नगरसेवक योगेश जानकर, विकास रेपाळे, शिवसेना विभागप्रमुख परेश चाळके, ज्येष्ठ शिवसैनिक देविदास चाळके, तसेच शशिकांत जाधव आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर