Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रणरागिणी आणि उबाठा गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का दक्षिण मुंबईतील तडफदार महिला नेतृत्व एकनाथ शिंदे गटात सामील.
मुंबई : संदिप शां. शिंदे.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेच्या शुभदिनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रणरागिणी आणि उबाठा गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेमध्ये गेली 45 वर्षे मीनाताई कांबळी कार्यरत होत्या. आपल्या कामाच्या बळावर संघटनेत त्यांनी अनेक पदे भूषवली. स्वर्गीय बाळासाहेब त्यांना रणरागिणी याच नावाने संबोधित करायचे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची महिला आघाडीला बळ मिळाले असून पक्षाचे विचार महिलांपर्यंत रुजवण्यासाठी त्यांचा निश्चित फायदा होईल असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. तसेच यावेळी त्यांची शिवसेनेच्या महिला नेतेपदी नियुक्ती देखील करण्यात आली.
सदर पक्षप्रवेश कार्यक्रमात सूरज कांबळी, अमित तसेच शिवडी येथे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज भालेकर यांनी आणि सामाजिक चळवळीत काम करणारे अनेक कार्यकर्त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी आमदार संजय शिरसाट, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, शिवसेना सचिव सुशांत शेलार, माजी नगरसेविका सौ.तृष्णा विश्वासराव, उपनेत्या सौ. कला शिंदे, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर