Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
शारदीय नवरात्रौत्सव प्रारंभ मुंबई प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात शिवसेना 214 शाखा यांनी उभारलेल्या भक्त सहायक कक्षाचा भक्तांनी घेतला लाभ.
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना भक्त सहाय्यक कक्षाला दिली भेट.
मुंबई : प्रतिनिधी.
शारदीय नवरात्रौत्सव प्रारंभ झाला असून नवरात्रौत्सव मंडळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.
उपवासाचे दिवस त्यात कडक उष्णता याचा त्रास भाविकांना होत आहे याची दखल घेत पालक मंत्री दिपक केसरकर यांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत बस सुविधा सुरू केली असून मा.अमित लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ताडदेव शाखा क्रमांक 214 शाखाप्रमुख श्री संतोष (शिवा) सावंत आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात भक्त सहाय्यक कक्षाची स्थापना केली
या कक्षाच्या माध्यमातून भाविकांना वैदाकिय सेवा, पाणी वाटप, उपवासाचे पदार्थ वाटप केले जात आहे त्यामुळे गर्दीतून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिलासा, मदत होत आहे
सदर कक्षाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून मा.दिपक केसरकर, श्री.किरण पावसकर, उमेश वळसे ( विभागीय पदाधिकारी ), विजय घरत(विभागीय पदाधिकारी ) संदिप शिंदे ( मुंबई सचिव, शिवसेना व्यापारी सेना ), प्रेम चौरसिया ( मुंबई समन्वयक व्यापारी सेना ) तसेच इतर राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. सदर सेवेचे नियोजन संतोष सावंत (शिवा) ( शाखाप्रमुख ) सौ. स्वाती राणे ( महिला शाखाप्रमुख ) स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते लक्ष्मण पवार, एजाज शेख, अभिजीत दळवी, रमेश जायगडे, सागर मालुसरे, रवींद्र बहुतुले, सुनील कांबळे, अर्जुन दुबे, छोटू शेख, समीर जायगडे, हितेश गुरव, अजय पटेल यांनी केले.
रिपोर्टर