Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
तरुणांना रोजगाराच्या संधी व ग्रामीण भागाच्या विकासास चालना देणाऱ्या "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र" या संकल्पनेचे उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते होत आहे, ही गौरवाची बाब आहे : एकनाथ शिंदे.
मुंबई : संदिप शां.शिंदे
राज्यातील 511 "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रां’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (19 ऑक्टोबर) रोजी ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
तरुणांना रोजगाराच्या संधी व ग्रामीण भागाच्या विकासास चालना देणाऱ्या "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र" या संकल्पनेचे उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते होत आहे, ही गौरवाची बाब आहे. हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
ही बैठक कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राज्यातील विभागीय आय़ुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून (ऑनलाईन) झाली. मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगापोल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक जयश्री भोज आदी उपस्थित होते. कौशल्य विकास आय़ुक्त डॉ. ए. रामास्वामी यांनी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या या संकल्पनेबाबत आणि उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची माहिती सादर केली.
रिपोर्टर