Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुंबई तील चांदीवली विभागाचे माजी नगरसेविका सौ.लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला.
मुंबईतील सर्व रस्ते येत्या दोन वर्षांत खड्डेमुक्त करण्याचा आमचा निर्धार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस मुंबईत वाढत असून 2017 साली निवडून आलेले 35 नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले : एकनाथ शिंदे.
मुंबई : संदिप शां. शिंदे
मुंबई तील चांदीवली विभागाचे माजी नगरसेविका सौ.लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला.
त्यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष माया खोत आणि उपाध्यक्ष जया नाडर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर मुंबईत झालेली विकासकामे तसेच मुंबईमध्ये झालेला बदल आज लोकांच्या डोळ्यासमोर आहे. मुंबईतील सर्व रस्ते येत्या दोन वर्षांत खड्डेमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
काल आपण स्वच्छता ही सेवा समजत एक तास स्वच्छतेसाठी दिला. मात्र आजही मुंबईतील कचरा उचलून मुंबईकरांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने काळजी घेणारे कामगार कशा अवस्थेत राहतात ते पहायला मी व्यक्तीशः पहाणी केली. त्यांचं राहणीमान सुधारावे, त्यांना देखील पाणी, शौचालय, उत्तम रस्ते अशा सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी मी मुंबई मनपा आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे यासमयी शिंदे यांनी सांगितले.
शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस मुंबईत वाढत असून 2017 साली निवडून आलेले 35 नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले असल्याचे यावेळी सांगितले.
आपल्याला अपेक्षित असलेला विकास नक्की होईल असे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
यासमयी आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.
रिपोर्टर