Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वतोपरी कार्यरत असणारे सफाई कामगारांच्या वसाहतींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट.
मुंबई : संदिप शां. शिंदे.
मुंबई शहर स्वच्छ करीत सुंदर ठेवण्यासाठी सर्वतोपरी कार्यरत असणारे सफाई कामगार नक्की कोणत्या परिस्थितीत जगतात ते पहाण्यासाठी दादर येथील मुंबईतील स्वच्छता कामगारांच्या वसाहतींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन त्यांची पाहणी केली.
दादर पश्चिमेकडील कासार वाडी आणि दादर पूर्वेकडील गौतम नगर परिसरातील सफाई कामगारांच्या वसाहतींना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी जे हात राबतात त्यांच्या घरांची, परिसराची, तेथील शौचालयांची पाहणी करून या गोष्टी ताबडतोब सुधारण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी मुंबई मनपा आयुक्तांना दिले. तसेच या सफाई कामगारांच्या वसाहतींचा संपूर्ण कायापालट करण्यात यावा असेही सांगितले. तसेच गौतम नगर येथे रखडलेल्या कामगारांचा वसाहतीचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश ही शिंदे यांनी दिले.
या वसाहतीतील सुविधांचा ताबडतोब स्वतंत्र टिमद्वारे आढावा घ्यावा आणि तिथे लवकरात लवकर सुधारणा घडवाव्या अशा निर्देश शिंदे यांनी दिले.
मुंबईकर नागरिकांचे आरोग्यासाठी जे हात राबतात त्यांना घराची काळजी घेण्याच्या हेतूने गांधी जयंतीच्या दिवशी भेटून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीदिनी आगळी स्वच्छांजली अर्पण केली.
या वसाहतींना नुसतीच भेट देऊन पाहणी केली नाही तर या सफाई कामगारांनी आपुलकीने दिलेला चहाचा देखील मुख्यमंत्री यांनी स्वीकार केला.
यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी वेलारासु तसेच मुंबई मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Mumbai #Maharashtra #SwachhataHiSeva
Sada Sarvankar Kalidas kolambkar
रिपोर्टर