Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी, विभागीय पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गजानन किर्तीकर यांच्या उपस्थित केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश.
मुंबईत आतापर्यंत उबाठा गटाच्या 33 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून आता ही संख्या 36 झाली आहे.
मुंबई : संदिप शां. शिंदे
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे तसेच त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश घेतलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
पक्षप्रवेश झालेल्यांमध्ये जोगेश्वरी येथील प्रभाग क्रमांक 73 चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका सौ.प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक 88 च्या माजी नगरसेविका सौ. स्नेहल शिंदे यांचा समावेश झाला. त्यांच्यासह जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
मुंबईत आतापर्यंत उबाठा गटाच्या 33 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून आता ही संख्या 36 झाली आहे.
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत अनेक विकासकामे वेगाने सुरू झाली असून त्यामुळे या आंतरराष्ट्रीय शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील रखडलेल्या इमारतींचा पूर्णविकासाला गती देऊन मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत घेऊन येणार असल्याचे यावेळी बोलताना शिंदे म्हणाले.
वर्षा या निवासस्थानी अनेक देशांचे राजदूत गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मुंबईत सध्या सुरू असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून हे शहर पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पाऊस थांबल्यानंतर सिमेंटचे रस्ते करण्याच्या कामाला गती येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या दोन ते अडीच वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याचे नमूद केले.
यावेळी खासदार गजानन कीर्तिकर शिवसेना नेते देखील उपस्थित होते.
रिपोर्टर