Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
कांदिवली चारकोप विभाग क्रमांक 2 आयोजित गोपाळकाला उत्सव 2023 ला मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लक्षणीय उपस्थिती..
मुंबई : संदिप शिंदे.
मुंबई ठाणे दहीहंडी उत्सव मोठ्या संख्येने पार पडला गेला विविध राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी उत्सव सार्वजनिक रजा दिल्यामुळे तरुणाईत मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला मिळाला त्यातच स्वतः एकनाथ शिंदे यांनी विविध कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली.
कांदिवली चारकोप येथील विभाग क्रमांक 2 आयोजित गोपाळकाला उत्सव 2023 कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते श्री.एकनाथ शिंदे यांची दादाजी कोंडदेव मैदान सेक्टर 2 चारकोप कांदिवली या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभली.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती ने कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली शिंदे साहेबांच्या भाषणाने उपस्थित युवा गोपालाना उत्साहात उत्सव साजरा करण्यास जोर चढला. जय श्री राम जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला.
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
उपस्थित सर्व गोविंदा पथकाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना सचिव श्री. सिद्धेश दादा कदम, शिवसेना सचिव श्री संजय मोरे साहेब, शिवसेना महिला उपनेते सौ शितलताई म्हात्रे, कार्यक्रमाचे आयोजक विभाग 2 चे विभाग प्रमुख श्री लालसिंह राजपुरोहित, महिला विभाग प्रमुख सौ विशाखा मोरया, व्यापारी सेनेचे मुंबई अध्यक्ष श्री.हितेश अजानी, व्यापारी सेना मुंबई सचिव श्री राजेश झुनझुनवाला, मालाड विधानसभा प्रमुख श्री.रत्नाकर वाळवे, मालाड महिला विधानसभा संघटक सौ राजेश्री राऊत, विधानसभा संघटक श्री. नवीन कादवडकर, उपविभाग प्रमुख श्री रोहन राणे शाखाप्रमुख श्री संतोष गवळी, शाखाप्रमुख श्री अरविंद साळुंखे, शाखाप्रमुख श्री गणेश पवार, शाखाप्रमुख श्री नितीन पवार, शाखाप्रमुख श्री अमित तुडें, शाखाप्रमुख श्री संदेश गव्हाणे, शाखाप्रमुख श्री विजय महाडिक, महिला शाखा संघटक सौ शितल मोरे, महिला शाखा संघटक सौ ज्योती म्हात्रे, इतर महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
रिपोर्टर