Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
ग्रँट रोड पश्चिम स्थानकाबाहेर बेस्ट बसेस चालकांची दादागिरी अनधिकृत पणे बसेस पार्क करून नागरिकांन सोबत भांडणे सुरूच..
खाजगी गाडीला बेस्ट बस चालकाने रागाच्या भरात ठोकले खासगी गाडीचे मोठे नुकसान झाले, त्यावर बेस्ट चालकाची आरेरावी ची आणि दादागिरीचा भाषा व्हिडिओ झाला व्हायरल.
ग्रँट रोड ब्रिज चे काम सुरू असताना तात्पुरत्या सोई नुसार बेस्ट प्रवाश्यांना ग्रँट रोड पश्चिम स्थानकाबाहेर 104 बस ला स्टॉप देण्यात आला परंतु ब्रिज चे काम पूर्ण झाल्या पश्चात बेस्ट प्रशासन ने तात्पुरती जागा सोडली नसून अनधिकृतपणे सर्रास बस गाड्या उभ्या केल्या जातात ज्यामुळे ट्रॅफिक मध्ये अडथळा निर्माण होऊ लागला.
स्थानिक रहिवाशी, व्यापारी यांनी वेळोवेळी प्रशासनास तक्रारी दिल्या परंतु तक्रारीवर दुर्लक्ष करण्यात आले. या उलट बेस्ट चालक यांच्या दादागिरी आणि अरेरावी मुळे ट्रॅफिक जॅम, भांडणे सुरू झाली अखेर पालक मंत्री दिपक केसरकर यांच्या सुसंवाद कार्यक्रमात स्थानिक रहिवाशी लक्ष्मण म्हस्के, समाजसेवक संदिप शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई शहर पालक मंत्री दिपक केसरकर यांना निवेदन दिले या वर दिपक केसरकर यांनी लवकरात लवकर बेस्ट बसेस पुनश्च मार्गावर आणण्यासाठी विषयाच्या संबंधित अधिकारी यांना सदर निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करणे बाबत सूचना देण्यात आली. पालकमंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेल्या दखल बाबत स्थानिक रहिवाशी यांनी आभार मानले होते परंतु अद्याप बेस्ट प्रशासनावर कोणतीच कारवाही झाली नाही या उलट बेस्ट चालक यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच जात आहे रोज ची भांडणे, ट्रॅफिक अडथळा होत आहे,
बेस्ट चालक बसेस अनधिकृत पार्क करत ऑन ड्युटी दुकानात पान सुपारी खाण्यास जातात, चहा टपरीवर थांबून टाईम पास करतात, काही चालक गाड्या पार्क करून वाईन शॉप वर जाऊन दारू विकत घेतात, अश्यात लोकांच्या मागणी ला विरोध करत भांडणे काढली जातात. येत्या काळात बेस्ट प्रशासन वर कारवाही करून बसेस मूळ रस्त्यावर वळवल्या जातील की नाही हे पाहणे महत्वाचे आहे.
https://youtu.be/Q4mxLHuBlhU?feature=shared
रिपोर्टर