Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
ठाण्यात चुकीच्या पद्धतीने वाहने उचलणाऱ्या व लुटालुट करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसना ठाणेकराने उघडे पाडले.
ट्रॅफिक पोलिस आणि गाड्या उचलणाऱ्या कंत्रादारांचे ठाणे कराने पितळ उघडे पाडले
चेतन चिटणीस या जागरूक ठाणेकराचा व्हिडिओ झाला प्रचंड वायरल..
ठाण्यातील कॅडबरी जंक्शनला श्री चेतन चिटणीस यांनी चुकीच्या पद्धतीने वाहने उचलणाऱ्या आणि लुटालुट करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांबरोबर खडाजंगी करून सगळ्या गाड्या सोडायला लावल्या.
गाड्या उचलून नेणाऱ्या व्हॅनच्या ड्रायव्हरकडे लायसन्स नव्हतं. गाड्या उचलण्याची कारवाई करण्याची परवानगी असल्याची कागदपत्रे नव्हती. योग्य पात्रतेचा अधिकारी गाडीमध्ये उपलब्ध नव्हता. गाड्या उचलण्याचं काम करणाऱ्या मुलांकडे कुठलीही पद्धतीचे अधिकृत ओळखपत्र नव्हती. तरीही हे लोक गाड्या उचलून पाच पाचशे, सात सातशे रुपये वसूल करतात. उघड उघड चाललेल्या लुटालुटी विरोधात आवाज उठवल्याबद्दल श्री चेतन चिटणीस या ठाणेकरांचे नागरिकांनी अभिनंदन केले.
https://youtu.be/U6o6HVBD2Fk
रिपोर्टर