Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
रुग्ण हक्क परिषद मिरा भाईंदर शहर पदी नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र प्रदान सोहळा मिरा भाईंदर येथे पार पडला..
मिरा भाईंदर : संदिप शिंदे.
मुंबई शहर मुख्य समन्वयक श्री संदिप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मिरा भाईंदर शहर अध्यक्ष श्री. प्रेम सागर चौरसिया यांच्या अध्यक्षतेखाली मिरा भाईंदर शहर पदी नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम दि. 27/07/2023 रोजी दुपारी ठेवण्यात आला होता. मोठंया प्रमाणात पाऊस सुरू झाला तरी सर्व नवं नियुक्त पदाधिकारी, कार्यकर्ते वेळेवर उपस्थित राहिले.
प्रमुख अतिथी : श्री. शशिकांत लिंबारे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री. राम कदम मुंबई शहर महा सचिव, श्री. संजय वाकडे मुंबई शहर उपाध्यक्ष तथा श्री. संदिप शिंदे मुंबई मुख्य समन्वयक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली रुग्ण हक्क परिषदचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शशिकांत लिंबारे यांनी संघटने बाबत माहिती देऊन गोरगरिबांसाठी संघटना कशा प्रकारे कार्य करते याची माहिती देऊन सामाजिक स्तरावर कार्य करण्यास नवीन सदस्यांना आव्हान केले.
डॉक्टरांच्या संरक्षणासाठी आणि रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या रुग्ण हक्क परिषद च्या नवनियुक्त सदस्य श्री.पवन त्रिपाठी यांस मिरा भाईंदर शहर उपाध्यक्ष, उषा चंद्रकांत पाटील यांस मिरा भाईंदर शहर सचिव श्री. जितेंद्र राजेंद्र कुशवाह यांस मिरा भाईंदर शहर संघटन मंत्री, श्री. संतोष दगडू तांबे यांस मिरा भाईंदर शहर उपसचिव, श्री. प्रवीण सिंग यांस मिरा भाईंदर शहर सह सचिव, श्री.दिनेश सिंग यास मिरा भाईंदर शहर उपसचिव, तसेच सौ. जयमाला शिंदे यांना नालासोपारा समन्वयक आणि श्री. सचिन वाईकर यांस वसई जिल्हा समन्वयक पदी नियुक्त करण्यात आले. सर्व उपस्थित प्रमुख अतिथी यांनी मिरा भाईंदर जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर चौरसिया आणि त्यांच्या नवनियुक्त सदस्यांना पुढील सामाजिक वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या..
रिपोर्टर