Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. मुंबई शहरासाठी 690 कोटींच्या प्रारूप आराखड्याला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबई शहरात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा आणि पुनर्वसन रखडलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर असून तो सोडवण्यासाठी समूह पुनर्विकास हाच पर्याय आहे. त्याद्वारे घरांसोबत प्राथमिक सोयीसुविधा देखील रहिवाशांना उपलब्ध करून देता येतील, त्यामुळे सामूहिक पुनर्वसन योजना राबवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सात यंत्रणांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई : वृत्तसंस्था
मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. मुंबई शहरासाठी 690 कोटींच्या प्रारूप आराखड्याला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबईकरांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यात म्हाडा, एसआरए, महानगरपालिका, कायदा आणि सुव्यवस्था, बीपीटी, आरोग्य विभाग, रस्ते, पाणीपुरवठा अशा सर्वच मूलभूत सोयीसुविधांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन ते सोडवावेत आणि लेखी उत्तरे संबंधित लोकप्रतिनिधींना पाठवावी असेही निर्देश यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले.
यासोबतच शहरात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा आणि पुनर्वसन रखडलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर असून तो सोडवण्यासाठी समूह पुनर्विकास हाच पर्याय आहे. त्याद्वारे घरांसोबत प्राथमिक सोयीसुविधा देखील रहिवाशांना उपलब्ध करून देता येतील, त्यामुळे सामूहिक पुनर्वसन योजना राबवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सात यंत्रणांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. यासोबतच शहरातील पाण्याचा प्रश्न तसेच वायू प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही शिंदे यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर तसेच मुंबईतील सर्व खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर