Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
तब्बल सात वेळा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सौ. तृष्णा विश्वासराव यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
सौ. तुष्णा विश्वासराव यांची शिवसेना उपनेते पदी वर्णी..
मुंबई : प्रतिनिधी
तब्बल सात वेळा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सौ. तृष्णा विश्वासराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने तसेच इर्शाळवाडी दुर्घटनेवेळी ज्या पद्धतीने मदतकार्यात स्वतःला झोकून देऊन काम केले, लोकांना धीर दिला आणि अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले, ते पाहून माझ्या नेतृत्वाबद्दल मनात आदर निर्माण झाल्यानेच शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे मत त्यांनी यासमयी व्यक्त केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अंगिकारून राज्य सरकारचे काम सुरू असून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच 80% समाजकारण आणि 20% राजकारण या बाळासाहेबांनी आखून दिलेल्या तत्वावर कार्य करताना संकटकाळात मदतीसाठी धावून जाणे हे शिवसैनिकाचे कर्तव्य असून कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणून मदतीला धावून गेलो असे यावेळी नमूद केले.
मुंबईचा कायापालट करून गेल्या 15 वर्षांत जे काम झाले नाही ते करायला सुरुवात केली असून आपल्या विभागातील प्रश्न देखील सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
याप्रसंगी आमदार सदा सरवणकर, आमदार आणि शिवसेना सचिव सौ.मनीषा कायंदे, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना सचिव सुशांत शेलार, नगरसेवक परमेश्वर कदम, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेना उपनेत्या सौ.कला शिंदे आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
रिपोर्टर