Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
रुग्ण हक्क परिषद मुंबई समन्वयक पदी नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र प्रदान सोहळा गिरगाव दक्षिण मुंबई येथे पार पडला.
गिरगाव मुंबई : प्रतिनिधी
डॉक्टरांच्या संरक्षण आणि रुग्णाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकमेव रुग्ण हक्क समितीच्या मुंबई शहरात मुंबई शहर मुख्य समन्वयक श्री संदिप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई समन्वयक पदी नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम दि. 18/07/2023 रोजी दुपारी 4.30 वाजता " मेहता मेंशन, परशुराम वाडी, गिरगाव, मुंबई. येथे ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रमा प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता "श्री. प्रेम चौरसिया" यांस मिरा भाईंदर महानगर पालिका अध्यक्ष पदी, समाज सेवक "श्री. राकेश पावसकर", आणि सामाजिक कार्यकर्ते तथा वंदे मातरम् फाउंडेशन चे अध्यक्ष "श्री. योगेश पिसाट" यांस मुंबई शहर सह समन्वक पदी प्रमुख अतिथी : श्री. शशिकांत लिंबारे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री. राम कदम, मुंबई शहर महा सचिव, मुंबई शहर उपाध्यक्ष श्री. संजय वाकडे, दक्षिण मुंबई सचिव श्री. अनिल माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून गौरविण्यात आले. आणि पुढील वैदाकिय वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या, सदर कार्यक्रमास रुग्ण हक्क परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पाऊस पडत असताना देखील कार्यक्रमास उपस्थित राहिल्या बद्दल आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन दिल्या बद्दल रूग्ण हक्क परिषद पदाधिकारी, नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे श्री. संदिप शिंदे मुंबई शहर मुख्य समन्वयक यांनी जाहीर आभार मानले..
रिपोर्टर