Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
वांद्रे येथील चेतना महाविद्यालय येथे मुंबई उपनगर जिल्हा समितीच्या बैठकीत 2023-24 मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी 976 कोटी रूपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला.
जिल्हा नियोजनांतर्गत प्रत्येक वॉर्डच्या कार्य क्षेत्रातील झोपडपट्ट्यांच्या मुलभूत सोयीसुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार - एड. मंगलप्रभात लोढा ( महाराष्ट्र राज्य मंत्री )
वांद्रे मुंबई : प्रतिनिधी
वांद्रे येथील चेतना महाविद्यालय येथे मुंबई उपनगर जिल्हा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत 2023-24 मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी 976 कोटी रूपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला आहे.
जिल्हा नियोजनांतर्गत प्रत्येक वॉर्डच्या कार्य क्षेत्रातील झोपडपट्ट्यांच्या मुलभूत सोयीसुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच तेथील बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, आरोग्य सुविधांचा विकास इत्यादी प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
2023-24 मध्ये 18.65 कोटी रूपयांच्या निधीमधून जिल्ह्यात महिला व बाल भवन बांधण्याचे प्रस्तावित असून, चेंबूर येथील चिल्ड्रन एड सोसायटीच्या मोकळ्या जागेवर हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय संस्थांचे बळकटीकरण, बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्यांचा विकास करण्यात येणार आहे.
पर्यटन विकासाच्या मुलभूत सुविधांकरिता 65 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिलेल्या जागेवर विविध पर्यटन विकासाचे प्रकल्प, भांडूप फ्लेंमिगो पार्क येथे पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविणे, पूर्व उपनगरातील खाडी किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यात येतील.
या बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, खासदार मनोज कोटक, आमदार अमित साठम, आमदार अतुल भातखळकर, आमदार डॉ. भारती लवेकर, आमदार मिहिर कोटेचा, आमदार योगेश सागर, आमदार सुनील राणे, आमदार मनिषा चोधरी, आमदार ऋतुजा लटके, आमदार ॲड. पराग अळवणी, आमदार दिलीप लांडे, आमदार अनिल परब, आमदार रमेश कोरगावकर, विलास पोतनीस, आमदार प्रकाश फातर्पेकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, अश्विनी भिडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
रिपोर्टर