Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला..
पंढरपूरातील 65 एकर परिसरात मोठ्या प्रमाणात दिंडी सोहळे उतरतात. एकनाथ शिंदे यांनी या परिसराची पाहणी करून वारकऱ्यांची सोय कशाप्रकारे करण्यात आली आहे याचा आढावा घेत संबंधित निर्देश दिले.
पंढरपूर : प्रतिनिधी..
आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे जाऊन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाला काही महत्वपूर्ण सूचना आणि निर्देश दिले.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या पत्रा शेड येथे करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला तसेच काही अपेक्षित बदल सुचवले. यासमयी रांगेत उभे असलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणेही जाणून घेतले.
मुख्य मंदिराला भेट देऊन विठुरायाचे आणि रुक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर प्रत्यक्ष मंदिरात आणि सभा मंडपात भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी करून काही सूचना दिल्या. यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराचा विनम्रपणे स्वीकार केला.
आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरातील 65 एकर परिसरात मोठ्या प्रमाणात दिंडी सोहळे उतरतात. या परिसराची पाहणी करून वारकऱ्यांची सोय कशाप्रकारे करण्यात आली आहे याचा आढावा घेत संबंधित निर्देश दिले.
यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
रिपोर्टर