Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
मुंबई काळाचौकी येथील गरजू विद्यार्थांना आर के फाऊंडेशन मार्फत शालेय वस्तू वाटप...
अभुदय नगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित दाखविली..
मुंबई ( काळाचौकी ) : संदिप शिंदे..
शालेय शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून महागाईच्या याकाळात शालेय वस्तू खरेदी करताना पालकांची तारांबळ उडाली आहे. कित्येक सामाजिक संस्था पुढे येऊन मदत कार्य करीत आहेत अशीची मुंबई काळाचौकी परिसरातील प्रसिद्ध आर के फाउंडेशन यांनी दरवषी प्रमाणे स्थानिक शालेय मुलांसाठी वस्तू वाटप कार्यक्रम पार पडला.
आर के फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार अभ्युदय नगर येथील शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे मोफत ( दप्तर / वह्या / कंपासबॉक्स / वॉटरबॅग / टिफ़ीनबॉक्स )आदी शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा अंतर्गत 600 मुलांनी याचा लाभ घेतला दरवर्षी विभागातील गरीब गरजू विध्यार्थाना शिक्षण घेता यावे म्हाणून हि संस्था असे उपक्रम करत असते. तसेच दरवर्षी छत्री वाटप करत असते. मुलांना तयाच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हि संस्था विविध स्पर्शेचे आयोजन करत असते.
आर के फाउंडेशनचे प्रमुख मा. श्री. राम कदम, सचिव सौ. सुप्रिया ताई कदम, आर के ग्रुप मुंबई चे डायरेक्टर आदित्य कदम आणि स्नेहा साळवी यांच्या आयोजनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुदर्शन चव्हाण, सुप्रसिद्ध समाजसेवक अनिल (भाऊ)माने, समाज सेवक महेश सुर्वे, पत्रकार मुकुंद गावडे, शेखर छत्रे आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद गावडे यांनी केले होत
रिपोर्टर