Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या आणि महत्वकांक्षी अश्या ठाणे शहरातील क्लस्टर योजनेचा शुभारंभ सोहळा मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला..
क्लस्टर योजनेच्या कशिश पार्क येथील कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले. तसेच किसन नगर येथील प्रत्यक्ष क्लस्टर इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले.
ठाणे : प्रतिनिधी..
आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या आणि महत्वाकांक्षी अशा ठाणे शहरातील क्लस्टर योजनेचा शुभारंभ सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. गेली अनेक वर्षे स्वप्नवत वाटणारी ही योजना प्रत्यक्षात येत असल्याबद्दल याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी क्लस्टर योजनेच्या कशिश पार्क येथील कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले. तसेच किसन नगर येथील प्रत्यक्ष क्लस्टर इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले.
ठाणे शहरातील किसन नगर परिसरातील धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी आजचा दिवस खरोखरच ऐतिहासिक आहे. कारण साईराज इमारत दुर्घटना मला आजही आठवते, त्या घटनेचे दुःख आजही माझ्या मनात आहे. मी आज राज्याचा मुख्यमंत्री असलो तरीही मनाने संवेदनशील असल्यानेच 1997 सालापासून या क्लस्टर योजनेसाठी संघर्ष केला, पावसाळ्यात दुर्घटना होऊ नयेत असे कायम वाटायचे, मात्र आज हा प्रकल्प सुरू होत असल्याचे समाधान मनात असल्याचे याप्रसंगी एकनाथ शिंदे उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले.
ठाणे क्लस्टर योजनेसाठी ठाणे महानगरपालिका आणि सिडको प्राधिकरण यांनी सामंजस्य करार केला असून इथे उभी राहणारी बांधकामे ही गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 हजार घरे देण्यात येणार आहेत. 1500 हेक्टरवर ही योजना उभी करण्यात येणार आहे. आज या योजनेचा शुभारंभ होत असून हा माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे. मात्र ज्या दिवशी या घरांची किल्ली देईन तो दिवस अधिक महत्वाचा असेल असे यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
ठाणे शहर आता बदलत असून शहरातील नव्याने तयार होत असलेले प्रकल्प वेळेत मार्गी लागतील. पुनर्वसन योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल असेही यासमयी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कुमार केतकर, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, ज्येष्ठ वास्तुविशारद हाफिज काँट्रॅक्टर, आमदार प्रताप सरनाईक, मा.आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, माजी महापौर व शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय मोरे, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि ठाणे शहरातील शिवसेना व भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर