Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
मुंबई शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणारा कोस्टल रोड वरील गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या मार्गावरील दुसऱ्या बोगद्याचे खनन काम पूर्ण झाले.
येत्या वर्षाखेरीस हा प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार..
मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतू यादरम्यान बनलेल्या या रस्त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार असून त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे.
हा मार्ग शिवडी-न्हावाशेवा कोस्टल रोडला देखील जोडण्यात येणार असून पुढे तो भाईंदर विरार पर्यंत वाढवनार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई : सोशल नेटवर्क..
मुंबई शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणारा "कोस्टल रोड वरील गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या मार्गावरील दुसऱ्या बोगद्याचे खनन काम आज पूर्ण झाले. भारतातील सर्वात मोठे टीबीएम मशीन असलेल्या "मावळा" या मशीनच्या सहाय्याने ही मोहीम फत्ते करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल, अश्विनी भिडे, मनपा अधिकारी देखील उपस्थित होते.
मुंबई किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोडचे खनन आता १०० टक्के पूर्ण झाले असून हा मार्ग पूर्ण होण्याच्या दिशेने टाकलेले अत्यंत महत्वाचे पाऊल ठरणार आहे. येत्या वर्षाखेरीस हा प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतू यादरम्यान बनलेल्या या रस्त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार असून त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे. हा मार्ग शिवडी-न्हावाशेवा कोस्टल रोडला देखील जोडण्यात येणार असून पुढे तो भाईंदर विरार पर्यंत वाढवून पश्चिम उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यासमयी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हा प्रकल्प पूर्ण करताना वरळी स्थानिक मच्छीमारांनी केलेल्या मागणीनुसार दोन खांबामधील अंतर वाढवून त्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून स्थानिक भूमिपुत्रांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितले.
हा प्रकल्प पूर्ण करणे हे एक आव्हान असून ते पेलणारे मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, एलअँडटी आणि इतर कंत्राटदार यांचे सर्व अभियंते, कर्मचारी यांचेही याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी भिडे, तसेच मुंबई महानगरपालिका आणि कोस्टल रोड प्रकल्पावर काम करणारे सर्व अधिकारी, अभियंते आणि कामगार उपस्थित होते.
रिपोर्टर