Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
मॉन्सूनपूर्व नालेसफाई दौऱ्यांतर्गत आज मुंबई पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला.
प्रथमच राजकीय कारकिर्दीत भर उन्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विभागीय नेते, मनपा आयुक्त यांनी नाल्यात उतरून नालेसफाई करणाऱ्या सफाई कर्मचारी सोबत चर्चा करून कामाचे कौतुक केले.
स्थानिक जनतेला विनंती 10 जून पर्यंत नाले साफ झाले नसतील, किंवा गाळ काढला नसेल तर त्याचे फोटो काढून मनपा हेल्प लाईन वर संपर्क करावे कारवाही न झाल्यास मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधावा कामचुकार पणा करणाऱ्या विभागीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त यांना दिले.
मुंबई : प्रतिनिधी..
मॉन्सूनपूर्व नालेसफाई दौऱ्यांतर्गत मुंबई पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. सांताक्रूझच्या मिलन सब-वे येथून या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. मिलन सब-वे येथील नाल्याजवळ बांधण्यात आलेले फ्लड गेट्स तसेच होल्डिंग पॉंडची पाहणी करून मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
अंधेरी पूर्व येथील गोखले पुलाच्या कामाची पाहणी करून या कामाचा आढावा घेतला. तसेच या पुलाखाली होणाऱ्या सौंदर्यीकरण कामाची माहिती घेतली. हा पूल येत्या दिवाळीपर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच तो पूर्ण होइपर्यंत रेल्वेचा पूल पादचाऱ्यांना वापरता यावा यासाठी पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांशी संवाद साधून त्यांना तशी विनंती केली.
ओशिवरा येथील नाल्याची पाहणी केली. नाल्यांचे खोलीकरण करून त्यांची वहनक्षमता वाढवावी तसेच संरक्षक भिंती उभाराव्यात असे निर्देश दिले. यावेळी प्रत्यक्ष नाल्यात उतरून परिस्थिती जाणून घेतली तसेच नालेसफाईचे काम करणाऱ्या कामगारांशी संवाद साधून त्याचे काम जाणून घेतले तसेच त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
यानंतर गोरेगाव, पोईसर, दहिसर येथील नद्यांच्या पात्रांना भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. नदी-नाल्यांतून निघणारा गाळ तीन दिवसानंतर वाहून न्यायलाच हवा तो तिथेच ठेवल्यास पुन्हा नाल्यात जाऊ शकतो त्यामुळे त्यावर अधिक काटेकोरपणे काम करावे असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. तसेच कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध मुंबईकरांच्या हिताच्या आड आले आणि नालेसफाई झाली नाही तर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मुंबई मनपा आयुक्तांना दिले.
यासमयी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार विद्या ठाकूर, आमदार अमित साटम, आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, उपायुक्त पी. वेलारासु, माजी नगरसेविका सौ.शीतल म्हात्रे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे पश्चिम उपनगरातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर