Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
LIC भाडेकरूंची पुनर्विकास प्रकल्पा संबंधित खासदार राहुल शेवाळे यांच्या सोबत दक्षिण मुंबई येथे चर्चा पार पडली.
गेल्या २० वर्षापासून प्रलंबित LIC भाडेकरू च्या पुनर्विकास प्रकल्प बाबत एल आय सी टेनेस्ट्स आणि ॲक्युपायांट्स वेल्फेअर असोसिएशन कमिटीने दक्षिण मुंबई येथील साई धाम मंदिरा बाजूच्या हॉल मध्ये सभा आयोजित केली होती.
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना पुनर्विकास प्रकल्प बाबत निवेदन देत भाडेकरूंना न्याय मिळावा या साठी कमिटीने राहुल शेवाळे यांस विनंती केली. भाडेकरूं यांच्या निवेदनावर मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत लवकरच चर्चा करून भाडेकरूंना न्याय देण्यास प्रयत्न करू आणि प्रकल्प मार्गी लावू असे आश्वासन राहुल शेवाळे यांनी दिले..
रिपोर्टर