Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
मरीन ड्राईव्ह जेट्टीकडील भाग सुशोभित करण्यात येणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई हे सुंदर आणि सुशोभित करून ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळखले जावे अशी राज्य सरकारची भूमिका आहे.
मुंबई : वृत्तसंस्था..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मरीन ड्राईव्ह येथे भेट देऊन पाहणी केली सोबत मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल आणि मनपा अधिकारी स्थानिक नेते सोबत मुंबई तील मरीन ड्राईव्ह येथे दररोज मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आज मरीन ड्राईव्ह परिसराची पाहणी करून मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
मरीन ड्राईव्ह येथे दररोज हजारो मुंबईकर फेरफटका मारायला येतात, पण या तुलनेत याठिकाणी फक्त एकच स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहाची साफसफाई आणि नीटनेटकेपणाची पाहणी केली. तसेच या स्वच्छतागृहांची संख्या वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देशित केले. तसेच मरीन ड्राईव्ह जेट्टीकडील भाग हा सुंदर आणि सुशोभित करण्याबाबतही पालिका अधिकाऱ्यांना सुचित केले. कोस्टल रोडच्या सुरू असलेल्या कामाचा देखील याप्रसंगी आढावा घेतला. या मार्गाचे काम वर्षाखेरीस पूर्ण होणार असून त्यानंतर तो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती यावेळी बोलताना दिली.
मुंबई हे सुंदर आणि सुशोभित करून ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळखले जावे अशी राज्य सरकारची भूमिका आहे.
यासमयी विधानसभा अध्यक्ष आणि या भागाचे आमदार ऍड. राहुल नार्वेकर, राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल तसेच मुंबई मनपाचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर