Breaking News
निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान !
दक्षिण मुंबईतील विल्सन कॉलेज मधील सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री श्री.एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांनी न्याय मिळवून दिला..
मुंबई : संदिप शां. शिंदे.
निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान या पंक्तीला सजेल असे कार्य महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः करत आहेत याचं सोबत भाजपा नेते, शिवसेना नेते गतिमान विकसित महाराष्ट्र राज्य बनवण्यात कार्य करीत आहेत याच सोबत कार्यकर्त्यांनी सुद्धा जनतेची सामाजिक कार्य करण्याचे आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले या वर दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध विल्सन कॉलेज मधील सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासन कमी हजेरीमुळे परीक्षेला बसू देत नव्हते विद्यार्थी इंटर्नशिप व महाविद्यालयाच्या फेस्टिवल, स्पोर्ट्स सारख्या अनेक इव्हेंट्स मध्ये भाग घेतला असल्यानेही त्यांना लेक्चर अटेंड करणे शक्य नव्हते ही बाब माहित असूनही सदर विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्यास मनाई करणाऱ्या व्यवस्थापनाची ही बाब चुकीची आहे याप्रकरणी सर्वपक्षीय गेल्या दोन दिवस विद्यार्थ्यांना आश्वासन देत होते. कॉलेज प्रशासन ही दखल घेत नव्हते.
सदर बाब समजल्यानंतर दक्षिण मुंबई शिवसेना पदाधिकारी शाखाप्रमुख ललित माधव, शाखाप्रमुख जितेंद्र भोईर, युवासेना मुंबादेवी महिला विभाग अधिकारी सौ.दिव्य शेट्टी-जाधव , रुपेश पाटील त्यांनी त्वरित विल्सन कॉलेज येथे धडक दिली व युवा सेना कोर कमिटी सदस्य महादेव जगताप व अमित लोटलीकर यांना संपर्क करून विल्सन कॉलेज महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक, परीक्षा समिती सोबत चर्चा करून सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देऊन दिलासा दिला.
याप्रकरणी विद्यार्थ्यांनी श्री.अमिटजी लोटलीकर,युवासेना कोअर कमिटी सदस्य महादेव जगताप, शाखाप्रमुख ललित माधव, शाखाप्रमुख जितेंद्र भोईर,रुपेश पाटील, युवासेना मुंबादेवी विभाग अधिकारी सौ. दिव्या शेट्टी जाधव यांचे आभार मानले व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री.एकनाथ भाई शिंदे साहेब यांना भेटून आभार मानण्याची इच्छा व्यक्त केली.
रिपोर्टर