Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
सर्वात मोठी बातमी, आप पक्षाचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळा प्रकरणी अटक.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआय मार्फत अटक करण्यात आलीय.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. आम आदमी पक्षाचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. उपमुख्यमंत्री सोबत मनिष सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री देखील आहेत. सीबीआय नी त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून. मनिष सिसोदिया यांच्या विरोधात मद्य घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन विभागात मद्य घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु होती. त्यांची रविवार सकाळपासून चौकशी सुरु होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठ तासांपासून त्यांची चौकशी सुरु होती. या चौकशीनंतर त्यांना आता अटक करण्यात आलीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयला चौकशी दरम्यान सिसोदिया यांनी सहकार्य केले नाही, घोटाळ्यात कमिशन खाल्ले, मोठ्या प्रमाणात मद्य परवाना खाजगी लोकांना फायदा देण्यात आला, घोटाळ्यातील पुरावे नष्ट केले इत्यादी आरोप मनिष सिसोदिया यांच्यावर आहेत.
मनिष सिसोदिया यांनी गेल्या काही दिवसांपासून मद्य घोटाळा प्रकरण चौकशी सुरू होती. ईडी, सीबीआयकडून सिसोदिया यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज सिसोदिया यांना अटक करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यंतरी दिल्ली महापालिकेची निवडणूक पार पडलेली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा भरघोस मतांनी यश मिळालं होतं. त्यानंतर मनीष सिसोदिया यांची पुन्हा चौकशी करण्यात आली होती.
आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनिष सिसोदिया यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेऊन आप पक्ष दिल्लीत चांगले कामे करत असून सिसोदिया यांना प्रकरणात अडकवण्याचे षड्यंत्र सुरू आहे, सिसोदिया हे निर्दोष असून एक चांगली व्यक्ती असून सरकारी यंत्रणा त्यांना खोट्या केस मध्ये अडकवत आहे असे प्रसार माध्यमं समोर म्हणाले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री मेडिकल टेस्ट केली जाणार मनिष सिसोदिया यांना उद्या कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर त्यांना किती दिवस कोठडी दिली जाते, त्यांच्या वरील आरोपांवर काय खंडन होते, घोटाळ्यात दोषी होतात की निर्दोष सुटका होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजपा पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आरोप प्रत्यारोप सुरू असून केंद्र सरकारची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
रिपोर्टर