Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
शनिपुष्ययोग : येत्या शनिवार पासून येणारे काही विशेष योग.
गिरगाव मुंबई : राजेंद्र बेंडखले
श्री स्वामी समर्थ येत्या माघ शुक्ल चतुर्दशी शनिवारी तारीख 4 फेब्रुवारी 2023 पुष्य नक्षत्र सकाळी 9.16 नंतर लागत आहे. पुष्य नक्षत्र हे शनीचेच नक्षत्र आहे. योगायोगाने शनिवारीच सकाळी नऊ सोळा नंतर नक्षत्र लागत आहे त्यात चतुर्दशी ही आहे.
येत्या शनिवारी कोणत्याही परिस्थितीत कोणीही कोणत्याही प्रकारे उधार उसनवार करू नये कर्ज प्रकरण वर सही करणे किंवा प्रत्यक्ष कर्ज घेणे असे काहीही करू नये. उलट चतुर्दशी तिथी शनिवार आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे सकाळी 9.16 नंतर अगदी अवश्य कर्ज परतफेड करावी. त्यातही दुपारी व संध्याकाळी शनीचा होरा असताना परतफेड केली तर ते अधिक उत्तम राहील.
आज काल ऑनलाइन पेमेंट मुळे अशी परतफेड अगदी सहज शक्य होऊ शकते. शनीचा होरा प्रत्येक शहराच्या सूर्योदय सूर्यास्त नुसार थोडा बहुत बदलत राहील. साधारण पणे शनीचा होरा दुपारी दीड ते अडीच रात्री साडेआठ ते साडेनऊ राहील. 4 फेब्रुवारी 2023 शनिवार रात्री साडेआठ ते साडेनऊ या दरम्यान शनी संदर्भातील जप दान करणे अधिक उत्तम फलदायी राहील.
4 फेब्रुवारी 2023 शनिवारी सकाळी 9:15 ते 12.00 आणि दुपारी तीन ते सूर्यास्त च्या दरम्यान केलेली पिंपळसेवा ही खूपच उत्तम फलदायी राहील. विशेषता ज्या राशींना चौथा आठवा शनी आहे, ज्यांची शनीची साडेसाती चालू आहे, ज्यांना शनीची महादशा चालू आहे त्या लोकांनी अवश्य शनिवारी शनि निमित्त जप दान पिंपळ सेवा करावी. परत परत सांगेन येत्या शनिवारी पुष्य नक्षत्र वर चुकूनही उधार, उसनवार, कर्ज घेऊ नका. कर्ज, उधारी परत अगदी अवश्य द्या. दुसऱ्या दिवशी माघ पौर्णिमा रविवारी 5 फेब्रुवारी 2023 ला दुपारी 12.13 बारा वाजून तेरा मिनिट पर्यंत पुष्य नक्षत्र आहे म्हणून 5 फेब्रुवारी 2023 रविवारी रवी पुष्य योग होत आहे. अत्यंत सुंदर योग होत आहे सर्वार्थ सिद्धी योग रविपुष्ययोग माघी पौर्णिमा असा त्रिवेणी संगम 5 फेब्रुवारीला होत आहे. या दिवस पासून तीक्ष्ण बुद्धिमत्ते करता रोज नित्य नियमाने सकाळी दहा पाठ प्रज्ञाविवर्धन स्तोत्र चे सुरू केले तर उत्तम फळ काही महिन्यातच मिळते.
रवी पुष्य योग हा मंत्र सिद्धी करता सर्वोत्तम योग आहे. त्याशिवाय या योग वरती औषधोपचार सुरू करणे सुद्धा अतिशय उत्तम मानले गेले आहे. तसेच या योग वर महालक्ष्मी अष्टकचे 27 पाठ सुरू करणे व महालक्ष्मी अष्टक चे 27 पाठ पुढील पुष्य नक्षत्र येईपर्यंत रोज करणे हे अत्यंत उत्तम फल दायक ठरते असा अनेकांचा अनुभव आहे. दुपारी 12. 13 पर्यंतच हा योग आहे. यादरम्यान आठ वर्षाखालील बालकांना आयुर्वेदाचार्य कडून शास्त्रशुद्ध पद्धतीने सुवर्ण बिंदू प्राशन करायला लावले तर अत्यंत उत्तम परिणाम समोर येतात.
एक रवीपुष्य योग अनेक बाबतीत फायदा देणारा ठरतो. मंत्र सिद्धी देवू शकतो. उत्तम बुद्धिमत्ता देवू शकतो. उत्तम आरोग्य देऊ शकतो. भगवती महालक्ष्मीची कृपा देवू शकतो. पण हे सर्व श्रद्धा विश्वासने करणे आवश्यक असते. ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या बघितले तर पुष्य नक्षत्र वृद्धीचे नक्षत्र आहे. खगोल शास्त्रीय दृष्ट्या बघितले तर या नक्षत्राची आकृती गायीच्या कासे सारखी असते. गाईच्या कासेतून अमृत सारखे दूध निघत असते आणि हे नक्षत्र पण असेच अमृत देणारे नक्षत्र आहे. पोष महिन्यात पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रात असतो म्हणून त्या महिन्याला पोष हे नाव पडले आहे. पुष नक्षत्राचा अधिपती शनी आहे. नक्षत्र क्रमांक हे आठवे नक्षत्र आहे. कर्क राशीत नक्षत्र येते. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ मानला गेलाय. चंद्र हा औषधींचा कारक मानला गेलाय. पुष्य नक्षत्रेचे चारही चरण कर्क राशीत आहेत. चंद्र हा एक मात्र कर्क राशीचा अधिपती आहे. त्यामुळे हे नक्षत्र धनदायक मानले गेले आहे. गुरु ग्रहाचा व पुष नक्षत्राचाही विशेष संबंध असेही म्हणले जाते की गुरू ग्रहाचा जन्म हा पुष्य नक्षत्रावर झाला आहे. पुष्य नक्षत्राची देवता सुद्धा पूजा करतात असेही म्हटले जाते.
अजून एक विशेष सांगितले जाते की पुष्य नक्षत्र मध्ये जन्मलेल्या व्यक्तींवरती कोणत्या ही प्रकारचे जादू टोणाचे प्रयोग चालत नाहीत हे कितपत सत्य आहे मला माहित नाही. तर अशा रवी पुष्य नक्षत्र योगावरती सर्वांनी साधना उत्तम प्रकारे केली तर दुसऱ्या दिवशी वर्षातून एकदाच होणारी गुरू प्रतिपदा आपल्या सर्वांना अधिक उत्तम फलदायी ठरेल. रवी पुष्य वर सुध्दा उधार उसनवार कर्ज घेवू नका.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।
सदर माहिती ज्योतिष पंचांग नुसार अग्रशित आहे..
रिपोर्टर