Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज..
चेंबूर पश्चिम येथील अनधिकृत बांधकामावर मनपा एम वॉर्ड ची मोठी तोडक कारवाही...
चेंबूर : संदिप शिंदे
बृहन्मुंबई महानगर पालिका एम वॉर्ड सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, उपयुक्त 5 हर्षद काळे यांनी नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून केली मोठी तोडक कारवाही..
मनपा एम वॉर्ड महानगरपालिका, अंतर्गत पी एल लोखंडे मार्ग चेंबूर पश्चिम येथील मनपा वसाहत मधील अतिक्रमण यांचेवर उपआयुक्त श्री. हर्षद काळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 31/04/2023 रोजी जेसिबी च्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर कारवाही दरम्यान एम वॉर्ड परिरक्षण विभाग अधिकारी, पोलीस यांचा बंदोबस्त होता सदर जागेवर मोठ्या प्रमाणात करोना काळात अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. स्थानिक जनता, सामाजिक कार्यकर्ता यांच्या तक्रारीवरून सदर तोडक कारवाही करण्यात आली असून मनपा एम पश्चिम येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरद हस्त खाली अनधिकृत बांधकामे चालू आहेत, भ्रष्ट मनपा अधिकारी आर्थिक फायद्यात झोलाझाप कंत्रादारांकडून पैसा घेऊन अनधिकृत बांधकामाना पाठीशी घालण्याचे काम करत आहे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी केलेल्या कारवाही चे कौतुक सुरू असून चेंबूर विभागातील अनधिकृत बांधकामावर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होईल अशी स्थानिक जनतेत चर्चा सुरू आहे. येत्या काळात अनधिकृत बांधकामावर मनपा काय कारवाही करेल हे बघणे महत्वाचे ठरेल..
#MBMC #demolition #hawkers #chembur #hmomaharashtra #Iqbalsinghchahal #harshad kale #BJP4Maharashtra
रिपोर्टर