Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
ठाणे शहरात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावली हजेरी.
ठाणे शहरातील आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांशी साधला संवाद..
ठाणे : संदिप शां. शिंदे.
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
ठाण्यातील जय महाराष्ट्र नगर परिसरातील #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षाच्या नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण पूजेनिमित्त भगवान श्री सत्यनारायणाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. तसेच शाखेच्या नोंदवहीत एकनाथ शिंदे यांनी अभिप्राय देखील नोंदवला. पक्षाच्या शाखा ह्या लोकांसाठी कायम उघड्या राहतील आणि इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला लागेल ती मदत केली जाईल असा विश्वास याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाणे पूर्व येथील सुयश कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत सहभागी होऊन मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. राज्यातील जनतेच्या मनातील सरकार आणण्याचा प्रयत्न आपण केला असून गेल्या सहा महिन्यात लोकहिताचे निर्णय घेतले असल्याचे यासमयी सांगितले. यावेळी ज्येष्ठ शास्त्रीय गायक महेश काळे आणि ठाणेकर अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील शिवाई नगर परिसरात कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या मालवणी महोत्सव 2023 या कार्यक्रमाला उपस्थित राहून जमलेल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. कोकणातील माणूस बाहेरून फणसासारखा काटेरी पण आतून गऱ्यासारखा गोड असतो असे कौतुक याप्रसंगी केले. तसेच कोकणचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही देखील यावेळी बोलताना दिली.
यासमयी आमदार रवींद्र फाटक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, आशुतोष नरेश म्हस्के, माजी नगरसेविका सौ.जयश्री फाटक, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे, सौ.स्नेहलता राणे, हाऊसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई, सुयश कला क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर