Breaking News
मुंबई पोलिसांनी ड्रामा क्वीन राखी सावंतला केली अटक.
मुंबई : वेदांत शिंदे
हिंदी चित्रपटसृष्टीतील ड्रामा क्वीन राखी सावंतला 19 जानेवारी रोजी आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबोली पोलीस काही वेळाने सावंत यांना अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत. मिळालेल्या माहितनुसार राखी सावंत आज दुपारी वाजता तिची डान्स अकादमी लॉन्च करणार होती. काही दिवसांपूर्वी तिच्या आदिल खान सोबत झालेल्या लग्नामुळे आणि आईच्या आजारपणामुळे चर्चेत असलेली राखी सावंतला दिवसेंदिवस त्रास वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, हिंदी चित्रपट अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रारकर्त्याने पत्रकार परिषदेदरम्यान शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला आणि आक्षेपार्ह भाषा वापरली असा आरोप केला आहे.
गेल्या वर्षी, राखी सावंतने पोलिसांना सांगितले होते की, शर्लिन चोप्राने 6 नोव्हेंबर 2022 रोजी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये तिने तिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि असभ्य भाषा वापरली होती.
सध्या मुंबई पोलीस अधिकारी या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत, मात्र वर्षाच्या सुरुवातीपासूनच सावंत यांच्या अडचणी वाढत आहेत.
रिपोर्टर