Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
शिवडी ते न्हावशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा अत्यंत महत्वाचा टप्पा असलेल्या ऑर्थोठ्रोपिकल स्टील डेक ची उभारणी करण्यात आली..
मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चीर्ले हा तीन तासांचा प्रवास अवघ्या वीस मिनिटात पूर्ण होणार..
मुंबई : संदिप शां. शिंदे.
महाराष्ट्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार ने महाराष्ट्र जनतेसाठी विकास कामांचा सपाटा लावला असून विविध प्रकल्प मोठ्या प्रमाणात युद्ध स्तरावर पूर्ण करण्याचे काम सुरू आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली आणि विविध सूचना देऊन कार्याची गती वाढवून कार्य प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यावर भर दिला आहे.
शिवडी ते न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा अत्यंत महत्वाचा टप्पा असलेल्या ऑथोट्रोपिकल स्टील डेक ची उभारणी करण्यात आली. या हार्बर लिंक प्रकल्पामुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हा तीन तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन कामाच्या प्रगतीची माहिती घेतली.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पकल्पाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले असून देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. या रस्त्याचे दुसरे महत्व म्हणजे या रस्त्यावर टोल भरण्यासाठी वाहनांना ताटकळावे लागणार नाही कारण ओपन रोड टोलिंग सिस्टीम असलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प असेल.
हा सागरी मार्ग उभारताना बांधकाम क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान वापरण्यात आले असून त्यामुळे शिवडी परिसरात येणाऱ्या फ्लेमिंगोच्या आगमनावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. आज या प्रकल्पातील 2300 मेट्रिक टन वजनाचा 180 मीटर लांबीचा सगळ्यात मोठा ओथ्रोटॉपिकल स्टील डेकची उभारणी करण्यात आली असून त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणे शक्य होणार आहे.
यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज हेदेखील उपस्थित होते.
रिपोर्टर