Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
बेस्ट वीज बिलासोबत अतिरिक्त अनामत रक्कम विरोधात आम आदमी पक्षाचा मुंबई शहरात यलगार....
मुंबईकरांना अनुरोध आहे की जर कोणी बेस्ट अधिकारी मीटर कापण्याची धमकी देत असेल तर त्वरित आम आदमी पक्षाचे प्रवक्ते एड. संदिप कटाके यांना संपर्क साधावा...
बेस्ट वीज बिलासोबत अतिरिक्त अनामत रक्कम SECURITY DEPOSIT घेत आहेत, बेस्ट जनतेची जी लूटमार चालू केली आहे, अतिरिक्त भार न भरल्यास मीटर कापण्याच्या धमक्या मुंबईकरांना दिल्या जात आहेत ही लाज वाटण्यासारखी बाब आहे. या विरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे,
दिल्ली सारख्या ठिकाणी आम आदमी पक्षाची सत्ता असून दिल्लीत मोफत वीज देऊन नफ्या मध्ये आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईत संपूर्ण बिल घेऊन सुद्धा तोट्यात कशी?
जनतेची दिशाभूल, फसवणूक करणाऱ्या बेस्ट वीज प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य सरकार विरोधात आम आदमी पक्षाने आंदोलन सुरू केले.
रिपोर्टर