Breaking News
*२४ प्राईम व्हिजन न्युज.*
अखेर अनधिकृत स्टॉल वर मनपाची डी विभागाची तोडक कारवाही..
मनपा डी वॉर्ड इमारत आणि कारखाने विभागातील अधिकारी, सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता अनधिकृत बांधकामे आर्थिक व्यवहार करून पाठीशी घालत आहेत.
अनधिकृत बांधकामवर इमारत व बांधकाम विभाग कायदेशीर कारवाई न करता वेळ काढू पणा चालू आहे :- संदिप शिंदे, माहिती अधिकार कार्यकर्ता.
मनपा डी वॉर्ड हद्दीत ग्रँट रोड पूर्व स्टेशन ला लागून मनपा जागेत अनधिकृत बांधकाम करून पान बिडी स्टॉल बांधण्यात आला होता, या स्टॉल मुळे रेल्वे प्रवासी यांना येण्या जाण्यास त्रास होत होता याची तक्रार ऑगस्ट २०२२ ला मनपा डी वॉर्ड इमारत आणि कारखाने विभागात दिली परंतु वेळ काढू पणा करत अधिकाऱ्यांनी या तक्रारीवर दुर्लक्ष केले, सुत्रा कढून मिळाल्या माहितीनुसार सदर अनधिकृत स्टॉल बांधणारा व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा तसेच इमारत व कारखाने विभागीय अधिकारी यांच्या बरोबर आर्थिक व्यवहार असल्यामुळे सदर बांधकामावर कारवाई होत नव्हती.
ही बाब लक्षात येता सामाजिक कार्यकर्ता, तक्रारदार संदिप शिंदे यांनी मनपा डी वॉर्ड वसाहत, परिरक्षण विभाग तसेच सहायक आयुक्त यांच्या निदर्शनास सदर बाब आणून कायदेशीर कारवाही करण्याची मांग धरली.
अखेर सहाय्यक आयुक्त शरद उघाडे, सहाय्यक अभियंता मनोज जेरुरकर, संजय पोळ यांच्या मार्गदर्शन आणि कनिष्ठ अभियंता संगोलकर, किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली अखेर अनधिकृत बांधकाम वर तोडक करून रेल्वे प्रवासी यांच्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आला.
अनधिकृत बांधकामवर अंकुश लागणे महत्वाचे आहे, मनपा डी वार्ड अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाही बाबत स्थानिक नागरिक अधिकाऱ्यांचे कौतुक करीत आहे, या पुढे सुद्धा अनधिकृत बांधकामवर, अनधिकृत स्टॉल वर डी वॉर्ड अधिकारी कारवाही करतील ही जनतेची अपेक्षा असून सदर मोकळ्या जागेवर पुनश्च अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी सदर मोकळ्या जागेत पाणपोई अथवा सुशोभीकरण करण्यात यावे असे स्थानिक जनतेची मागणी मनपा डी वॉर्ड सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांना करण्यात येणार आहे.
रिपोर्टर