Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
विटा येथील दोन स्वतंत्र नगरपालिकांबाबत ९ डिसेंबर पूर्वी लेखी उत्तर द्या - मुंबई उच्च न्यायालय.
ठाणे - विटा / वृत्तसंस्था..
विटा शहराच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या मागणीबाबत सर्व संबंधितांनी ९ डिसेंबरपर्यंत हजर राहून लेखी उत्तर सादर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य शासनाने ३१ ऑगस्ट २०१८ रोजी अधिसूचना जारी करून विटा शहराचे विटा पूर्व आणि विटा पश्चिम अशा दोन स्वतंत्र भागात रुपांतर केले आहे. विटा येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल शितोळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका (रिट याचिका क्रं ९९८८) दाखल केली आहे. या याचिकेमध्ये जर शहराचा वाढलेला आकार आणि वाढलेली लोकसंख्या विचारात घेऊन राज्य शासनाने विटा शहराचे दोन स्वतंत्र गावांना मंजुरी दिली आहे. तर या दोन गावांचा स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी दोन स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था ( अर्थात दोन स्वतंत्र नगरपालिका ) केल्या पाहिजेत अशी मागणी केलेली आहे.
याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश एस. के. शिंदे यांनी नगर विकास मंत्रालयाचे मंत्री आणि संबंधित सचिव तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि विटा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस जारी केली आहे. या नोटिसीमध्ये विटा शहराच्या दोन स्वतंत्र गावांबाबत (पूर्व आणि पश्चिम) दोन स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीबाबत नऊ डिसेंबर पूर्वी सर्वांनी हजर राहून लेखी उत्तर सादर करणे बाबतचे आदेश जारी केले आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्ते राहुल शितोळे यांच्या वतीने ॲड लक्ष्मण कालेल यांनी बाजू मांडली, तर सरकारी वकील म्हणून ॲड सी. डी. मॉल यांनी काम पाहिले.
रिपोर्टर