Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
तीन महिन्यात महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका, महानगर पालिका निवडणूक लागणार.
मुंबई : वृत्तसंस्था.
महाराष्ट्र राज्यातील दहा महापालिका आणि नगरपालिकांचा कारभार सध्या प्रशासकाच्या ताब्यात आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद येथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अनधिकृत कामे सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यातच सर्वसामान्य नागरिकांना थेट अधिकाऱ्यांना समस्या सांगाव्या लागत आहे. भ्रष्ट, कामचुकार अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना अडचणी भेडसावत आहेत त्यामुळे महापालिका निवडणुका जाहीर कराव्या अशी मागणी स्थानिक जनतेकडून केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. परंतु राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला निविर्वाद विजय मिळाला आहे.
महायुतीच्या यशात जनतेचा कौल असल्यामुळे राज्य सरकार पुढील तीन महिन्यांत महापालिका, नगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सूत्राकडून समजते.
मुख्यमंत्री पदाच्या तिढा लवकरच सुटून राज्य सरकारचा शपतविधी पार पडल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असून फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात निवडणुका होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
रिपोर्टर