Breaking News
उद्या मध्यरात्रीपासून राज्यात नाईट कर्फ्यू लागू होणार
- राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधांची नवी नियमावली जाहीर
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
देशासह राज्यभरात कोरोनाचा आणि ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार होत आहे. याला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारकडून कोविड- १९ निर्बंधांची नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दिनांक ९ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ही नवी नियमावली लागू होणार आहे. उद्या मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू होणार असून, रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरण्यावर निर्बंध असतील.
राज्यातील स्विमिंग पूल, स्पा, सलुन १० तारखेपासून पूर्णतः बंद राहणार आहेत. सिनेमागृहे व नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेसह सुरु राहतील. पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी टुरिस्ट स्पॉट, किल्ले, म्युजियम बंद राहणार आहेत. शॉपिंग मॉल्स ,मार्केट, खाजगी कार्यालये ५० टक्के उपस्थिती सुरू राहतील. ज्या नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. ज्या नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच आता सार्वजनिक प्रवास करता येणार आहे.
उद्या मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू होणार असून, रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरण्यावर निर्बंध असणार आहेत. RAT testing करावी लागणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थित होणाऱ्या बैठकांवर निर्बंध लावण्यात आले असून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे इथून पुढे बैठका घेण्याचे आदेश या नियमावलीत आहेत. सर्व आस्थापना रात्री दहानंतर बंद राहणार आहेत. जिल्हा अंतर्गत प्रवास करताना सर्व कोरोना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला विविध ठिकाणी दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल.
रिपोर्टर