Breaking News
तरुणांसाठी मुंबईत बीजेवायएमचे करिअर दिशा अभियान
- तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईने (बीजेवायएम) राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर दिशा अभियान सुरू केले आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यामार्फत मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत झाला. या अभियानांतर्गत इयत्ता दहावी ते ३० वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांना शिक्षण आणि नोकरी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, 'दिशा योग्य असेल तर परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही आणि तरुणांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करू शकतात. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्य नेहमीच तरुणांच्या कल्याणासाठी योग्य दिशेने मार्ग मोकळा करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही मुंबईतील तरुणांसाठी घेऊन आलो आहोत' , असेही तेजिंदर सिंग तिवाना यावेळी म्हणाले.
'करिअर दिशा अभियान' हे मुंबईतील सर्व ३६ विधानसभांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या अंतर्गत १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि एनडीए सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी अनुभवी सल्लागारांकडून मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज आणि शासकीय प्रकल्पांचा लाभ घेण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. मुलाखतीची तयारी, प्रभावी बायोडेटा कसा तयार करायचा, रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल.