Breaking News
मुलुंड (पूर्व) मधील छत्रपती संभाजीराजे मैदान
ठरतेय विविध खेळाडूंच्या सरावाचे आवडते ठिकाण
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबईकर नागरिकांना विरंगुळा म्हणून ठिकठिकाणी उद्याने फुलविताना क्रीडापटूंना खेळ आणि सरावासाठी मैदान उपलब्ध व्हावे म्हणून महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत वेगवेगळ्या परिसरात मैदानेही जपण्यात आली आहेत. यामध्ये अग्रस्थानी आहे ते खेळाडूंच्या सरावाचे आवडते ठिकाण म्हणून नावाजलेले पूर्व उपनगरातील मुलुंडमधील छत्रपती संभाजी राजे मैदान
मुलुंड (पूर्व) मध्ये वीर सावरकर मार्गावर २६ हजार २१६ चौरस मीटर क्षेत्रावर छत्रपती संभाजी राजे मैदान विस्तारलेले आहे. सकाळी ६ पासून रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असलेले हे मैदान कायम गजबजलेले असते. कारण या मैदानावर निरनिराळ्या सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.