एमएमआरसी आणि जायका यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांना स्वच्छतेशी निगडित वस्तूंचे वितरण
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
महात्मा गांधी जयंती निमित्ताने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (एमएमआरसी) जपान इंटरनॅशनल कॉ-ऑपरेशन एजन्सी (जायका) यांनी प्रदान केलेल्या स्वच्छतेशी निगडित वस्तू, माहिती आणि संवाद साहित्याचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम एमएमआरसीच्या कार्यालयात रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक; आर. रमणा, कार्यकारी संचालक (नियोजन), एमएमआरसी; नागाई शिंसुके, वरिष्ठ प्रतिनिधी आणि तगुची युसुके, प्रतिनिधी, जायका यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कोविड -१९ सह संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जायकाने " अच्छी आदत" नावाने मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी जसे हात धुणे, नखं स्वच्छ ठेवणे तसेच योग्य प्रकारे मास्क घालणे याविषयी जागरूकता निर्माण करणे आहे. या उपक्रमांतर्गत जायकाद्वारे मुंबई मेट्रो लाइन -३ प्रकल्पामधील बांधकाम स्थळांवरील फ्रंट-लाइन कामगारांना स्वछतेशी निगडित साहित्याचे वाटप करण्यात आले.