Breaking News
अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी दिलीप मालखेडे यांची नियुक्ती
मुंबई : लोकवार्ता टाईम्स
पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ.दिलीप नामदेवराव मालखेडे यांची अमरावतीच्या संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली आहे. डॉ.मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार - १ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत. माजी कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ दिनांक १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते. यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
रिपोर्टर