Breaking News
यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून सर्व गणेशभक्तांना आवश्यक सूचना
- मिरवणूकीस मनाई
- साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
यंदाही कोविड-१९ या साथरोगाच्या प्रादूर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासन स्तरावरुन वेळोवेळी नागरिकांना करण्यात आले आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी गणेशोत्सव-२०२१ साजरा करताना पालन करावयाच्या आवश्यक सूचना महापालिकेने जाहीर केल्या आहेत. यामध्ये मिरवणूकीसही मनाई करण्यात आली आहे.
सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झाला आहे. या प्रकोपापासून स्वतःचे व कुटुंबियांचे संरक्षण करुनच गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. यासाठी यावर्षीच्या (सन २०२१ च्या) गणेशोत्सवादरम्यान खालील निर्बंध पाळण्यात यावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेतर्फे भाविकांच्या सुरक्षेच्या हितासाठी करण्यात आले आहे.