Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
उबाठा गटाचे माजी नगरसेवक विष्णू सावंत, माजी नगरसेविका सौ.विनया सावंत यांच्यासह त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी तसेच सह्याद्री विकास संस्थेच्या अध्यक्ष सरला सावंत, काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख विजय गोमा पाटील, दिंडोशी विधानसभा संघटक सीताराम जाधव, उबाठा गटाच्या महिला उपविभाग संघटक सौ. पूनम वैद्य यांनीही केला शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश.
मुख्यमंत्री कुठे आहेत असे विचारणाऱ्यांना मला एवढच सांगायचे आहे की मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी आजही कार्यरत आहे : एकनाथ शिंदे
मुंबई : संदिप शां. शिंदे.
उबाठा गटाचे माजी नगरसेवक विष्णू सावंत आणि माजी नगरसेविका सौ.विनया सावंत यांच्यासह त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी "शिवसेना" पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सगळ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासह सह्याद्री विकास संस्थेच्या अध्यक्ष सरला सावंत, काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख विजय गोमा पाटील, दिंडोशी विधानसभा संघटक सीताराम जाधव, उबाठा गटाच्या महिला उपविभाग संघटक सौ. पूनम वैद्य यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशामुळे उबाठा गटातून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांची संख्या 36 एवढी झाली आहे. येणाऱ्या काळात ही संख्या अजून वाढेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून हे सर्व पदाधिकारी आज पक्षात येत आहेत याचे समाधान ही शिंदे यांनी व्यक्त केले.
गेली अडीच वर्षे राज्यातील सर्व विकासकामे मग ती मेट्रो असो की आरे कारशेड असो वैयक्तिक अहंकारापोटी ठप्प झाले होते. त्यामुळे राज्यात सत्तेत येताच ही सर्व कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी त्यांना गती दिल्याचे सांगितले. सध्या काही जण घरी बसून देखील मुख्यमंत्रीपद सक्षमपणे भूषवता येते असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. मात्र घरी बसून साधं नगरसेवक पद देखील भूषवता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. फेसबुकवरून महापूर हाताळता येत नाही त्यासाठी फिल्डवर उतरावेच लागते असे यावेळी शिंदे यांनी निक्षून सांगितले.
मुख्यमंत्री कुठे आहेत असे विचारणाऱ्यांना मला एवढच सांगायचे आहे की मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी आजही कार्यरत आहे आणि यापुढेही राहणार असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर, महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, उत्तर पश्चिम लोकसभा संपर्कप्रमुख उदय सावंत, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, विभागप्रमुख गणेश शिंदे, सौ. कला शिंदे हे देखील उपस्थित होते.
रिपोर्टर