Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
वंजारी सामाजिक संघटना यंदा ही अनंत चतुर्थी श्री गणेश विसर्जन दिवशी खाद्य पदार्थ आणि पाणपोई चे वितरण पार पडले.
मुंबई : संदिप शां. शिंदे
वंजारी सामाजिक संघटना, अध्यक्ष तथा मोटिवेशन स्पीकर डॉ दिलीप शांताराम नागरे यांनी ग्रँट रोड पूर्व, अलीभाई प्रेमजी मार्गावर अनंत चतुर्थी श्री गणेश विसर्जन निमित 2003 रोजी पाणपोईची सुरवात केली यंदा वर्ष 20 वे होते गेले 2006 रोजी पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभाग अध्यक्ष : श्री अनिल नागरे यांच्या संयुक्त विध्यमानांने पाणपोई व अल्पउपहाराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला विभागातील स्थानिक नगरसेवक, आमदार, विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सिने कलाकार, पत्रकार, समाजसेवक, व्यापारी , मित्र मंडळी, विभागातील रहिवाशी असे अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणाहून आवर्जून कार्यक्रमाला हजेरी लावत असतात.
कार्यक्रमाची समाप्ती शेवटचा गणपती जाई पर्यंत असते प्रत्येक गणपती मंडळाचे स्वागत, पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह, श्रीफळ देऊन सत्कार केला जातो.याही वर्षी संघटने मार्फत श्री गणेशाच्या विसजनात मोठ्या प्रमाणत वडापाव, बिस्किटे, वेफर्स, आणि पाण्याचे वाटप विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनमध्ये करण्यात आले, सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत कार्यक्रमाचा लाभ घेतला
रिपोर्टर