Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
शिंदे सरकार कामगिरी दमदार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सरकारी कामाचा, निर्णयांचा धडाका लावला आहे मंत्रिमंडळात विविध प्रकरणावर जनहितार्थ निर्णय घेण्यात आले..
मुंबई : संदिप शां. शिंदे
मंत्रिमंडळनिर्णय...
उमेद च्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1076 कोटींची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत वाढ करुन 30 हजार रुपये तर,समुदाय संसाधन व्यक्तींना दरमहा देण्यात येणारे मासिक 6 हजार रुपये करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळनिर्णय..
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचनासाठी 11 जलसंपदा प्रकल्पांसाठी 13 हजार 677 कोटी रुपयांच्या सुधारित वाढीव खर्चास मंजूरी दिली आहे. साखळी बंधाऱ्यांमधील प्रत्येक बंधाऱ्यासाठी स्वतंत्र मान्यता न घेता प्रकल्प म्हणून एकत्रीत प्रशासकीय मान्यता घेता येईल.
मंत्रिमंडळनिर्णय
शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी "दत्तक शाळा योजना" राबविण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेत रकमेच्या स्वरुपात देणगी देता अथवा स्वीकारता येणार नाही. देणगीदारास पाच वर्षे अथवा दहा वर्षे कालावधीसाठी शाळा दत्तक घ्यावी लागेल.
मंत्रिमंडळनिर्णय..
समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमातंर्गत करार पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरावरील कार्यालयातील 64 व जिल्हास्तरावरील कार्यालयातील 6187 असे एकूण 6251 कर्मचारी यांना याचा लाभ मिळेल.
मंत्रिमंडळनिर्णय..
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत सौर ऊर्जा कुंपणाच्या किंमतीच्या 75 टक्के किंवा 15 हजार रुपये यापैकी जी कमी असेल अशी रक्कम थेट हस्तांतरण पद्धतीने अनुदान स्वरुपात देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळनिर्णय
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत सौर ऊर्जा कुंपणाच्या किंमतीच्या 75 टक्के किंवा 15 हजार रुपये यापैकी जी कमी असेल अशी रक्कम थेट हस्तांतरण पद्धतीने अनुदान स्वरुपात देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रिपोर्टर