Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
शाहरुख खानच्या "मन्नत" घराबाहेर आंदोलन मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा..
ऑनलाईन गेमिंग ॲपला सपोर्ट केल्याबद्दल लोकांनी केला शाहरुख खान चा निषेध..
मुंबई : गुरुदत्त वाकदेकर
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या आगामी "जवान" चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, काही संघटनांनी किंग खानच्या "मन्नत" घराबाहेर निदर्शने केली. पण मुंबई पोलिसांनी त्यांना मनमानी करू दिली नाही आणि अभिनेत्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली.
जाणकार्यांच्या माहितीनुसार, ऑनलाइन गेमिंग ॲपला सपोर्ट केल्याबद्दल अभिनेत्याचा निषेध करण्यासाठी काही लोक जमले होते. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाच जणांना अटक केली आणि तेथील बंदोबस्त वाढवला. या आंदोलकांनी दुपारी एकच्या सुमारास शाहरुख खानच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. सध्या शाहरुख खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वास्तविक ही बाब ऑनलाइन गेमिंग जाहिरातीशी संबंधित आहे. शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी ऑनलाइन गेमिंग ॲपची जाहिरात केली होती. ज्यामुळे त्याच्या विरोधात निदर्शने झाली होती. या जाहिरातींमध्ये प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री काम करतात, हे समाजाची दिशाभूल करण्याचे काम असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष कृष्णचंद्र अदल यांनी सांगितले.
शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी "जवान" चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याचा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये किंग खान व्यतिरिक्त अनेक साऊथ सुपरस्टार देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. शाहरुख खान पहिल्यांदाच विजय सेतुपती आणि नयनतारा सोबत दिसणार आहे. यासोबतच दीपिका पदुकोणही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या शाहरुख खानच्या जवानाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
रिपोर्टर