Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज...
अभिनंदन..!
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत मराठमोळ्या महाराष्ट्राचा प्रथमेश जावकर ठरला जगातला सर्वोत्तम तिरंदाज....
भारताचा उगवता तिरंदाज प्रथमेश जावकर याने तिरंदाजी विश्वचषकात सर्वोत्तम खेळ दाखवत सुवर्णपदक पटकावले. प्रथमेशने या मोठ्या स्पर्धेत करिष्माई कामगिरी दाखवत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू नेदरलँडचा माईक श्लोएसरचा पराभव करत यश संपादन केले आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी प्रथमेशने इंडोनेशियाच्या धनी दिवा प्रदाना, कोरियाच्या किम जोंघो, डेन्मार्कच्या मार्टिन डॅम्सबो आणि कोरियाच्या चोई योन्घी यांचा पराभव केला.
चीनमधील शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक २०२३ मध्ये भारताने दोन सुवर्णपदके जिंकली. प्रथमेश जावकरने स्टेज 2 मध्ये वैयक्तिक पुरुष कंपाऊंड सुवर्णपदक जिंकले. तर मिश्र सांघिक स्पर्धेत ज्योती सुरेखा वेणम व ओजस प्रवीण देवतळे यांनी सुवर्णपदक पटकावले.
टीम इंडियाचे अभिनंदन
साभार : सोशल मीडिया
रिपोर्टर