Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मराठी चित्रपटांनसाठी राज्य सरकारचा निर्णय पुन्हा मिळणार अनुदान लवकरच विधेयक मंजूर करण्यात येणार...
मराठी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, मराठी जनतेसाठी महत्त्वाची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई : संदिप शां. शिंदे.
महाराष्ट्र सरकारकडून मराठी चित्रपटांना दिले जाणारे अनुदान बंद झाले होते. मराठी चित्रपटांना अनुदान ( सबसिडी) मिळावी याबाबत भाजपा चित्रपट संघटनांनी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुंनगंट्टीवार यांच्या कडे मागणी केली होती त्यानुसार तातडीने मराठी अनुदान समिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती रविवारी पत्रकारांशी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी दिली.
मराठी चित्रपटांचे अर्ज आल्यानंतर तीन महिन्यांच्या आत चित्रपटाला अनुदान देण्याची व्यवस्थाही केली जाईल. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांना नेहमीपेक्षा दुप्पट अनुदान दिले जाईल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
मराठी चित्रपट अनुदानावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता अनुदानासाठी पारदर्शक यंत्रणा आणली जाणार आहे. यासाठी चित्रपटांचे 'अ', 'ब' आणि 'क' या तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाईल आणि श्रेणीनुसार अनुदान दिले जाईल अशी माहिती मुंनगंट्टीवार यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारचे मंत्री सुधीर मुनगंट्टीवार म्हणाले प्रेरणादायी, सामाजिक विषयांवर आधारित आणि सामाजिक आशय असलेल्या चित्रपट आणि कथांवर आधारित मराठी चित्रपटांना विशेष अनुदान दिले जाईल. या बैठकीत भाजप पुरस्कृत भाजप चित्रपट संघटनेचे पदाधिकारी संदिप घुगे, मराठी सिनेमा क्षेत्रातील कलाकार महेश कोठारे आणि प्रसाद ओक तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार जैकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी उपस्थित होते.
रिपोर्टर