Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिंदे गटाचे प्रकाश निकम आणि उपाध्यक्षपदी भाजपा चे पंकज कोरे..
पालघर / संदिप शिंदे.
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रकाश निकम यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे पंकज कोरे यांची निवड झाली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वारसा विचारांचा’ या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवोदित टीमचा जाहीर सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या भावी कार्यकाळाकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या.
#हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेला हा मोठा विजय असून बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळालेला हा आशीर्वाद असल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री रामदास कदम, माजी खासदार आंनदराव अडसूळ, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख मंत्री, आमदार आणि पालघरचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, पालघरचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, नीलम संख्ये, मुकेश पाटील, अमोल पाटील, नवीन दुबे याप्रसंगी उपस्थित होते.
रिपोर्टर